अबबब……….46 दूचाकी , 05 चारचाकी वाहनांसह एकूण 44,26,400/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

गडचिरोली पोलिसांची कोंबडा बाजार जुगारावर ऐतिहासिक धाड, एकूण 92 आरोपींना घेतले ताब्यातगडचिरोली जिल्ह्रातील काही दुर्गम व ग्रामीण भागात कोंबडा बाजार जुगार खेळला जातो. अवैध कोंबडा बाजार भरवून कोंबड्यांच्या झुंजीवर पैंज लाऊन जुगार खेळणा­-यांवर गडचिरोली पोलिसांनी ऐतिहासिक धाड टाकली. गडचिरोली जिल्ह्यातील रेगडी पोलीस ठाणे हद्दीतील गरंजी टोला येथे असा बाजार भरला असल्याची माहिती मिळाली. खात्री झाल्यावर धाड टाकली असता जुगार खेळणा-­यांनी जंगलाच्या दिशेने पळ काढला होता. पोलीसांनी घटनास्थळावरुन एकूण 92 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील

1) एकूण 46 जुन्या वापरत्या मोटारसायकल अंदाजे एकूण किंमत 16,10,000/- रु.

2) एकूण 05 जुने वापरते चारचाकी वाहन एकूण किंमत 26,00,000/- रु. 3)

3) एकूण 31 जुने वापरते मोबाईल फोन अंदाजे एकूण किंमत 1,70,000/- रु.

एकूण 42,950/- रु. रोख रक्कम अशा वर्णनाचा एकूण 44,26,400/- रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *