जहाल नक्षली, डिव्हीसीएम भिमन्ना कुळमेथे आणि त्याची पत्नी डिव्हीसीएम विमलक्का सडमेक हिचेसह एक कमांडर, दोन पीपीसीएम व एक एसीएम पदावरील नक्षल्यांचा समावेश, महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे जाहिर केले होते एकुण 62 लाख रुपयांचे बक्षिस, गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे सन 2025 मध्ये आतापर्यंत एकूण 40 नक्षल्यानी केले आत्मसमर्पण
06 जहाल वरिष्ठ नक्षल्यानी पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांच्या समोर गडचिरोली पोलीस मुख्यालयात आत्मसमर्पण केले. जहाल नक्षली, डिव्हीसीएम भिमन्ना कुळमेथे आणि त्याची पत्नी डिव्हीसीएम विमलक्का सडमेक हिचेसह एक कमांडर, दोन पीपीसीएम व एक एसीएम पदावरील नक्षल्यांचा यात समावेश आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे एकुण 62 लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे सन 2025 मध्ये आतापर्यंत एकूण 40 नक्षल्यानी आत्मसमर्पण केले आहे.
1) भिमन्ना ऊर्फ सुखलाल ऊर्फ व्यंकटेश मुत्तय्या कुळमेथे (डिव्हीसीएम, उत्तर बस्तर डिव्हीजन मास टिम) वय 58 वर्षे, रा. करंचा ता. अहेरी, जि. गडचिरोली,
2) विमलक्का ऊर्फ शंकरअक्का विस्तारय्या सडमेक, (डिव्हीसीएम, माड डिव्हीजन, डीके प्रेस टिम इंचार्ज), वय 56 वर्ष, रा. मांड्रा, ता. अहेरी, जि. गडचिरोली,
3) कविता ऊर्फ शांती मंगरु मज्जी, (कमांडर, पश्चिम ब्युरो टेलर टिम), वय 34 वर्षे, रा. पडतानपल्ली, ता. भामरागड, जि. गडचिरोली,
4) नागेश ऊर्फ आयताल गुड्डी माडवी (पीपीसीएम, कंपनी क्र. 10), वय 39 वर्षे रा. पामरा, ता. भैरामगड, जि. बीजापूर (छ.ग.),
5) समीर आयतू पोटाम, (पिपीसीएम, दक्षिण ब्युरो टेक्नीकल टिम), वय 24 वर्षे, रा. पुसणार, ता. गंगालूर, जि. बीजापूर (छ.ग.),
6) नवाता ऊर्फ रुपी ऊर्फ सुरेखा चैतू मडावी, (एसीएम, अहेरी दलम), वय 28 वर्षे, रा. नैनेर, ता. अहेरी, जि. गडचिरोली
अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्याची नावे आहेत.
रश्मि शुक्ला यांच्या भेटीदरम्यान त्यांनी मागील काही दिवसात मौजा कवंडे , मौजा कोपर्शी-फुलनार , मौजा मोडस्के जंगल या तिनही अभियानात सहभागी विशेष अभियान पथकातील अधिकारी व जवानांचा सत्कार केला. नव्याने स्थापन झालेल्या अति-संवेदनशिल पोस्टे कवंडे येथे भेट देऊन त्यांनी पोस्टे कवंडे येथील जवानांच्या अभियानाच्या तयारीची पाहणी केली. तसेच पोस्टे कवंडे येथील गडचिरोली पोलीस, सिआरपीएफ, एसआरपीएफ व सी-60 च्या जवानांसोबत संवाद साधला व अशा प्रतिकुल अतिसंवेदनशिल ठिकाणी पोलीस स्टेशन स्थापना व त्याच्या संरक्षणाबद्दल केलेल्या प्रयत्नांसाठी जवानांची प्रशंसा केली.


