गेल्या काही वर्षात परदेशातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली
चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प आता परदेशी पर्यटनाच्या अग्र पसंतीवर आलाय. गेल्या काही वर्षात परदेशातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली. उत्तम निवास सुविधा आणि सफारी व्यवस्थापनामुळे परदेशी पर्यटकांनी ताडोबाला पसंती दिली आहे. या प्रकल्पात हमखास व्याघ्र दर्शन या दृष्टीने महत्वाचे ठरले आहे.
संपूर्ण भारतात 58 व्याघ्र प्रकल्प आहेत. 1727 चौरस किलोमीटर मध्ये पसरलेल्या ताडोबात जंगल सफारी साठी बफ्फर क्षेत्रात 16 व कोर क्षेत्रात 6 सफारी गेट आहेत.TATR मध्ये कोर व बफ्फर क्षेत्रात सुमारे 100 वाघांची नोंद आहे. वाघा सोबत ताडोबा जंगलात leopard, Barking beer, Spotted deer, Sambar, Four horned antelope, Blue bull,Indian gaur, Grey langur, Wild dog, Wild boar, Sloth bear, Indian jackal, Small indian civet, Palm civet, Rattle, Wild cat, Porcupine, Mongoose, Indian peafowl, Hare, Grey jungle fowl, Monitor lizard आणि ईतर वन्य प्राण्यांची नोंद आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात 2024 -25 साली कोर क्षेत्रात 7770 व बफर क्षेत्रात 7713 परदेशी पर्यटक पोचले.
1 एप्रिल 2025 – ते 31 मार्च 2026 पर्यंत कोर क्षेत्रात 9077 व बफर क्षेत्रात 9982 परदेशी पर्यटक पोचले
एकूण पर्यटकांच्या आकडेवारी नुसार 2024- 25 मध्ये 4.19% तर 2025- 26 मध्ये 5.17 % परदेशी पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घेतला.
