गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातल्या छत्तीसगड सीमेवरील पोलीस -नक्षल चकमकीत आतापर्यंत 7 नक्षलवादी टिपल्याची माहिती, याच चकमकीत एक जवान झालाय शहीद, तर एक जवान झालाय जखमी

मृत नक्षलवाद्यांमध्ये गडचिरोली विभागीय कमिटी प्रभारी, वेस्ट सब-झोनल ब्युरो प्रभारी तसेच सीपीआय माओवादी संघटनेच्या कंपनी क्रमांक 10 चा प्रभारी प्रभाकर, रा. कामारेड्डी, तेलंगणा याचा समावेश, प्रभाकर याच्यावर एकूण 25 लाखांचे होते बक्षीस

मागील 03 दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्याच्या छत्तीसगड सीमेवर सुरू असलेल्या पोलीस-नक्षल चकमकीच्या अखेरीस एकूण 07 नक्षल्यांचे मृतदेह (04 पुरुष व 03 महिला) हस्तगत करण्यात आले असून, त्यासोबतच घटनास्थळावरून

03 AK-47,
01 SLR आणि
01 .303 रायफल

अशी एकूण 05 अग्निशस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. नक्षल नेता प्रभाकर याच्या व्यतिरिक्त अन्य 6 नक्षल्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

प्रभाकर गडचिरोली विभागीय कमिटी प्रभारी, वेस्ट सब-झोनल ब्युरो प्रभारी तसेच सीपीआय माओवादी संघटनेच्या कंपनी क्रमांक 10 चा प्रभारी होता. तो तेलंगणा राज्यातील कामारेड्डी येथील रहिवासी होता. प्रभाकर याच्यावर एकूण 25 लाखांचे बक्षीस होते.

यादरम्यान, याच चकमकीत सी-६० पथकातील जवान दीपक चिन्ना मडावी (वय ३८ वर्षे), रा. अहेरी व मूळ रा. मांड्रा , दामरांचा, ता. अहेरी यांनी काल सायंकाळी नक्षल्यांशी झालेल्या तीव्र चकमकीत शौर्याने लढा देत 02 नक्षल्यांना कंठस्नान घातले होते. त्यांना दुखापतीमुळे वीरगती प्राप्त झाली आहे.

अभियानादरम्यान आणखी एक जवान जोगा मडावी, रा. किष्ट्यापल्ली यांनाही काल रात्री गोळी लागून दुखापत झाली होती. त्यांना देखील हेलिकॉप्टरच्या मदतीने तातडीने बाहेर काढून गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर आहेत व त्यांच्यावर गडचिरोली येथे उपचार सुरू आहेत. लवकरच त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *