चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या आंबोली जवळील लावारी येथे वाघाने केलेल्या हल्ल्यात शेतात काम करणारी महिला विद्या कैलास मसराम 42 हिचा मृत्यू झालाय. महिला आपल्या नवऱ्यासोबत भाड्याने घेतलेल्या धानाच्या शेतात खत टाकण्यासाठी बैलगाडीने गेली होती.
दरम्यान शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला करत शेतालगत असलेल्या तलावाच्या पाळीवर ओढत आणले. पती आणि नातेवाईक शेतात आल्यानंतर त्यांना घडला प्रकार लक्षात आला.
वनपथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या मदतीने मयताच्या नातेवाईकांना तातडीची मदत देण्यात आली. शव पोस्ट मार्टम साठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले. मागणीनुसार वाघाला जेरबंद करण्यात येईल असे आश्वासन वनविभागाद्वारे देण्यात आले.
