चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात मुल-मारोडा जंगलात सोमनाथ प्रकल्पात व आसपास धुमाकूळ घालणारी वाघीण जेरबंद करण्यात आली आहे.
या भागात ग्रामस्थ मृत्यू आणि हिंसक हल्ल्यांसाठी ही वाघीण जबाबदार होती. वनकर्मचारी व पशुबैद्यकीय अधिकारी , यासह शीघ्र प्रतिसाद दलाच्या अधिकारी, कर्मचारी जवानांनी यात सहभाग घेतला.
वाघिणीला डार्ट मारून बेशुद्ध केल्यावर घटनास्शळी पंचनामा करुन प्राथमिक उपचार केंद्र चंद्रपुर येये हलविण्यात आलेले आहे.
