भाजपच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी नेत्यांच्या मागे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळेल अशी आशा करू नका असे ठणकावले
राज्यात पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपुरात महत्त्वाचे विधान केले आहे. भाजपच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना त्यांनी नेत्यांच्या मागे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळेल अशी आशा बाळगू नका असे ठणकावले. प्रभागातील जनताच आता तिकीट ठरवणार असून अंतर्गत सर्वेक्षणाअंती हा निर्णय होणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. चंद्रपुरात आ.मुनगंटीवार आणि आ. जोरगेवार या भाजपच्या दोन तंबूत सुरू असलेल्या तुफान गटबाजीनंतर बावनकुळे यांचे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.
