चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील विरखल चक येथे गावात आलेला अस्वल वनविभागाने केला जेरबंद

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील विरखल- चक गावात कालपासून ठाण मांडून असलेल्या आणि पहाटे एका घरात आश्रयास असलेल्या अस्वलास जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले असून भयभीत असलेले गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. आधी ही गावाजवळ अस्वल चिंचेच्या झाडावर चढली. वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. भेदरलेल्या अस्वलीने नवीन बांधकाम सुरू असलेल्या एका घरात ठाण मांडले. गस्तीवर असलेल्या वनकर्मचारी यांनी तात्काळ सदर घराचे दरवाजे बंद केले व याबाबत वरिष्ठ वनाधिकारी यांना माहिती दिली. पथकाने बेशुद्धीने सदरचे अस्वलास पिंजऱ्यात जेरबंद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *