आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कक्ष क्रमांक 107 मध्ये धडक देत उघडकीस आणला प्रकार
आज 15 सप्टेंबर अभियंता दिन. चंद्रपूर जिल्हा परिषदेत नियुक्तीला असलेल्या काही अभियंत्यांनी शहराच्या मध्यवर्ती भागात जटपुरा गेट परिसरात असलेल्या वसंत भवन सदस्य निवास येथील कक्ष क्रमांक 107 मध्ये ओली पार्टी केली. या पार्टीची कुणकुण लागताच आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कक्षात धडक देत हा प्रकार उघडकीस आणला. तेव्हा येथे उपस्थित 7 अभियंते कक्षातील प्रसाधन गृहात लपण्यासाठी पळताना दिसले.
वसंत भवन सदस्य निवास अन्य कुणालाही देण्यासाठी सतत नकार दिला जातो. मात्र अभियंत्यांनी केलेल्या या ओल्या पार्टीवर आश्चर्य व्यक्त होत आहे. आम आदमी पक्षाने या प्रकरणाची माहिती जि प सीईओ पुलकित सिंग यांना दिली. यावर सीईओंनी माहिती व्हाट्सअप वर पाठवा अशी सूचना केली. या प्रकरणाची चौकशी करून दोषी अभियंत्यांवर कारवाई करण्याची मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.
