चंद्रपुरात बंजारा -धनगर समाजाच्या संभाव्य एसटी प्रवर्ग समावेशा विरोधात गोंडवाना गणतंत्र पार्टी सह आदिवासींचे धरणे आंदोलन

सरकारने असा प्रयत्न केल्यास विदर्भभर आंदोलन करण्याचा इशारा

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालया पुढे आज गोंडवाना गणतंत्र पार्टी कार्यकर्त्यांनी समस्त आदिवासी बांधवांसह जोरदार निदर्शने केली. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील बंजारा आणि धनगर समाजाच्या संभाव्य एसटी प्रवर्ग समावेशा संदर्भात मागण्या केल्या जात आहेत.

मात्र या दोन्ही समाजाच्या चालीरीती राज्यघटनेनुसार आदिवासी प्रथा परंपरानुसार नाही. त्यामुळे या दोन्ही समाजांचा एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यात येऊ नये अशी आग्रही मागणी आदिवासी आंदोलकांनी केली आहे. तसा प्रयत्न झाल्यास विदर्भभर आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *