चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील सामदा परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या टी-122 या नर वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर यश आलं आहे. या वाघाने गेल्या काही दिवसांत तीन जणांचा बळी घेतला होता, तर एकाला जखमी केलं होतं. डार्ट मारून वाघाला पकडण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर वनविभागाने संपूर्ण परिसर नो मॅन्स लँड तयार करत 30 बाय 30 फुटांचा महाकाय पिंजरा उभारला होता. राज्यात पहिल्यांदाच वापरण्यात आलेल्या या विशेष पद्धतीने अखेर वाघाला जेरबंद करण्यात यश आलं असून, वनविभागाने सुटकेचा निःश्वास
