,येत्या काळात रस्ते अपघात प्रमाण दहा टक्क्यांनी कमी करण्याचे ठेवले लक्ष्य
चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस विभागाच्या वार्षिक तपासणीसाठी नागपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील शहरात दाखल झाले.त्यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी टक्केवारी कमी झाल्याचे सांगितले. येत्या काळात दोषसिद्धी वाढविणे आणि रस्ते अपघात प्रमाण दहा टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य असल्याचे पाटील म्हणाले. जिल्हाभरात रस्ते अपघातात झालेली वाढ लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभाग, मनपा आणि संबंधित सर्व यंत्रणांच्या सहकार्याने वाहतूक आराखडा तयार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पाटील यांच्या हस्ते 118 हरवलेले मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. मागील महिन्यात एका उद्योगाच्या पायाभरणीसाठी जिल्ह्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योग आणि उद्योजक यांना सतावणा-यांना आडवे करू असे स्पष्ट केले होते. महानिरीक्षक पाटील यांनी तीच री ओढताना उद्योगांना सकारात्मक वातावरण मिळावे यासाठी पोलीस दल कार्यरत राहणार असल्याचे आवर्जून सांगितले.

