एसटीच्या सवलतींसाठी एनसीएमसी कार्ड वितरण; माजी जि.प. सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना कार्ड प्रदान

महाराष्ट्र शासनाच्या एसटी महामंडळाच्या सवलतीच्या योजना घेण्यासाठी महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या एनसीएमसी कार्ड चे वितरण जिल्हा परिषद चे माजी सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा पारडी पं. स. प्रमुख व कृऊबास संचालक धनराज ढोक , शक्ती केंद्र प्रमुख गुरुदेव नागापुरे , बुथ प्रमुख प्रविण श्रीरामे यांची प्रमुख उपस्थिती होती.
एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी ब्रम्हपुरी डेपोत जाऊन यासाठी संपूर्ण दिवस खर्ची घालावा लागतो व यात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या मार्गदर्शनात माजी जि. प. सदस्य संजय गजपुरे यांनी या शिबिराचे आयोजन करुन परिसरातील महिला व ज्येष्ठ नागरिकांना गावातच ही सोय उपलब्ध करून या शिबिराचे आयोजन केले. या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेत लाभार्थ्यांनी शिबिराला उदंड प्रतिसाद दिला.
आता हे कार्ड उपलब्ध झाल्यानंतर सदर कार्ड ॲक्टीव्ह करुन लाभार्थ्यांना गावातच उपलब्ध करुन देण्यात आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. महिला व ६५ वर्षावरील नागरिकांना या कार्डद्वारे तिकिटात ५०% सवलत मिळणार असून ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सोय उपलब्ध होणार आहे.
आतापर्यंत पारडी- मिंडाळा – बाळापुर जि.प. क्षेत्रातील देवपायली , वासाळामेंढा , कोसंबी गवळी, मिंडाळा व नवेगाव हुंडेश्वरी या गावातील कार्डांचे वितरण करण्यात आले आहेत. नागरिकांच्या अडचणी लक्षात घेत सातत्याने सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत असलेल्या संजय गजपुरे यांच्या या लोकाभिमुख सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *