मुसळधार पावसाने शहराला झोडपले, सुमारे तासाभरापासून शहरात पावसाचे थैमान

पावसाच्या तासभर आधी प्रचंड कडाडत्या विजांनी नागरिकांना केलेभयभीत

चंद्रपूर:–चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याला काल रात्री पुन्हा एकदा मुसळधार पावसाने झोपून काढलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे आणि यामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी नाले दुथडी भरून वाहताय.

चंद्रपूर शहराजवळील इरई धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आल्यामुळे इरई नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. यासोबतच वर्धा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे. यवतमाळ, अमरावती आणि वर्धा या तीन जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे वर्धा नदी दुथडी भरून वाहत आहे आणि हीच नदी चंद्रपूर जिल्ह्यात पूर येण्याचं कारण ठरू शकते.

वर्धा नदीला आलेल्या पुराचा फटका इरई नदीला देखील बसला असून यामुळे चंद्रपूर शहरातले रहमत नगर आणि सिस्टर कॉलनी भागातल्या काही परिसरात नदीचे पाणी शिरलं आहे. यामुळे काल रात्री जवळ जवळ 50 ते 60 लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *