चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरातल्या कर्मवीर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर रोज संध्याकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना रविवारी एक अनपेक्षित आणि धक्कादायक दृश्य बघायला मिळालं. सायंकाळी सुमारे ७ वाजता, एका झाडावर दोन बिबट्याची पिले आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
नागरिक आपल्या रोजच्या सवयीप्रमाणे मैदानात फेरफटका मारत असताना, अचानक काही जणांच्या नजरेस झाडावर हालचाल जाणवली. निरीक्षण केल्यावर बिबट्याचे पिल्ले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. काही जणांनी वनविभागाला माहिती दिली. बिबट्याची पिल्लं जरी लहान असली, तरी त्यांची आई आसपास असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वनविभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
