चंद्रपूर :चंद्रपूर महानगरपालिकेत जटपुरा प्रभागात अतिशय काटे की आणि रंजक अशी लढाई होत आहे. या ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना उबाठा असा सरळ मुकाबला असून भाजपकडून माजी नगरसेविका आणि भाजपच्या महिला शहराध्यक्ष छबुताई वैरागडे निवडणूक लढवत आहेत तर दुसरीकडे शिवसेना जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे यांची पत्नी मनस्वी गिर्हे त्यांना आव्हान देत आहे. चंद्रपूर मनपातली ही अतिशय हाय व्होल्टेज निवडणूक मानल्या जात असून प्रभागाच्या विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवली जात आहे आहे.
