चंद्रपुरात जनविकास सेनेच्या माध्यमातून महाकाली मंदीर मार्गावर करण्यात आले आंदोलन, आंदोलक कार्यकर्त्यांनी दुभाजक तोडले
अत्यंत दुरावस्थेत असलेल्या रस्त्यावर सुमारे चार कोटीच्या रस्ता दुभाजकाचे काम करून चंद्रपूर मनपाने नवा विक्रम केलाय. याविरोधात चंद्रपुरात जनविकास सेनेच्या माध्यमातून महाकाली मंदीर मार्गावर जोरदार आंदोलन करण्यात आले.
चंद्रपूर मनपाच्या विरोधात जोरदार नारेबाजी करत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणाऱ्या कंत्राटदाराचा निषेध केला गेला. संतप्त आंदोलक कार्यकर्त्यांनी दुभाजक देखील तोडले. याचदरम्यान निकृष्ट दर्जाच्या सळाखीचा वापरही पुढे आला. सौंदर्यीकरणाचा भाग असलेले दुभाजक उभारण्यापेक्षा आधी रस्ता दुरुस्त करण्याची आग्रही मागणी आंदोलकांनी यावेळी केली.
