गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम नेलगुंडा येथील नागरिकांसाठी गडचिरोली पोलीस आणि ग्रामस्थांनी श्रमदानातून उभारला पूल, नेलगुंडा पोलीस ठाणे पथकाकड8 राबविण्यात आला समाजाभिमूख उपक्रम

गडचिरोली जिल्ह्रातील नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागातील नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषत: पावसाळ्याच्या काळात नाले – नद्यांना पुराने भरल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचणी निर्माण होतात. अशातच नेलगुंडा पोलिस ठाणे हद्दीतील मौजा नेलगुंडा या गावाजवळील नाल्यामूळे वाहतूकीचा मार्ग बंद होत असल्याने नेलगुंडा पोलिस पथक आणि एसआरपीएफच्या जवानांनी नागरिकांच्या सुविधेसाठी श्रमदानातून पूलाची उभारणी केली आहे. नेलगुंडा गावाजवळ असलेल्या नाल्यामध्ये साठलेल्या पावसाच्या पाण्यामूळे वाहतूकीची समस्या निर्माण होऊन इतर गावाशी संपर्क तुटत असतो.

या दरम्यान वैद्यकीय मदत आणि शालेय विद्यार्थी यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. येथील नागरिकांच्या वाहतूकीच्या समस्येवर उपाय म्हणून पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे जवान आणि एसआरपीएफच्या अंमलदारांनी श्रमदानातून एक नवीन पुुल तयार केला आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे पुलावरुन येणे जाणे सुखकर झाले. पोलीस दल केवळ सुरक्षेसाठीच नव्हे, तर समाजाच्या विकासासाठीही कटिबध्द आहे हे या उपक्रमाव्दारे अधोरेखित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *