नक्षलविरोधी अभियानातील उत्कृष्ट कामगिरीची दखल, गडचिरोली पोलीस दलातील पाच सहाय्यक पोलीस निरीक्षकांची पोलीस निरीक्षक पदी वेगवर्धित पदोन्नती

आतापर्यंत एकूण 404 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना वेगवर्धित पदोन्नती

गडचिरोली जिल्ह्यात कर्तव्य बजावताना उत्कृष्ट कामगिरी, धाडसी कारवाया, शौर्य व उल्लेखनीय सेवेमूळे गडचिरोली पोलीस दलातील पाच सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या कार्याची दखल घेत गृह विभागाने पोलीस निरीक्षक पदी वेगविर्धित पदोन्नती दिली आहे.

पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत हा समारंभ पार पडला. गडचिरोलीसारख्या अतिसंवेदनशील आणि नक्षल प्रभावित जिल्ह्यात अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत धैर्य, शिस्त, प्रामाणिकपणा आणि समर्पित भावनेने सेवा बजावणा-­या अधिका­-यांच्या कार्याचा गौरव म्हणून ही वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्यामूळे पोलीस दलाची प्रतिमा अधिक उंचावली असून इतर अधिका­यांनाही उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रेरणा मिळणार आहे.

1) सपोनि. योगिराज जाधव
2) सपोनि. सचिन झनक
3) सपोनि. बाबासाहेब दुधाळ
4) सपोनि. सुनिल बागल आणि
5) सपोनि. राहुल देव्हडे यांच्या खांद्यावर पोलीस निरीक्षक पदाची चिन्हे लावून त्यांचा सन्मान करण्यात आला. गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक एम. रमेश यांनी वेगवर्धित पदोन्नती प्राप्त पोलीस अधिकारी वर्गाचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *