भारतीय संचार निगम लिमिटेड (BSNL) येथील कनिष्ठ अभियंता अभिजीत अशोक जिवणे यांनी २४ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार रामनगर पोलिस ठाण्यात दाखल केली होती.
या तक्रारीनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना कोसारा परिसरात एका आयशर ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात कॉपर भरून असल्याची माहिती मिळाली.पोलिसांनी छापा टाकून तपासणी केली असता चोरीचा कॉपर माल सापडला. यावेळी नरेंद्र सोरनसिंह मौर्या (उधनी, बदायु – उत्तरप्रदेश) आणि नाजिम शेख असमुद्दीन शेख कलपीया (बदायु – उत्तरप्रदेश) यांना अटक करण्यात आली.या आरोपींकडून तब्बल 44,48,300/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
