चंद्रपूर जिल्ह्यातील दक्षिण ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातल्या हळदा जंगलात T -120 वाघीण जेरबंद करण्यात आली आहे. या परिसरातील गावांमध्ये वाघिणीने दहशत पसरवली होती. 9 जुलै रोजी कुरण शेतशिवारात काही दिवसांपूर्वी वाघिणीने एका ग्रामस्थाला ठार केले होते. त्यानंतर वाघिणीला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. वनविभागाच्या पथकाने आज ही कारवाई केली.
