चंद्रपुरात कर्करोगाला कारणीभूत असलेला थाई मांगुर माशाचा साठा पोलिसांनी केला जप्त, केंद्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या या माशांच्या साठ्याच्या जप्तीसाठी स्थानिक बंगाली कॅम्प मासळी बाजारात रामनगर पोलिसांची कारवाई

चंद्रपुरात कर्करोगाला कारणीभूत असलेला थाई मांगुर माशाचा 600 किलोचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. केंद्र शासनाने थाई मांगुर हा मासा देशात संवर्धन, विक्री आणि खाद्य म्हणून प्रतिबंधित केला आहे. गुप्त माहितीनुसार रामनगर पोलिस ठाणे पथकाने माशांच्या साठ्याच्या जप्तीसाठी स्थानिक बंगाली कॅम्प मासळी बाजारात कारवाई केली. तेव्हा त्यांना हा प्रकार नजरेस पडला.

आंध्रप्रदेशच्या इलुरु जिल्ह्यातील व्येंकटेश्वरराव ग्रुिपथीराव घंटासाला नामक मासे विक्रेत्याला पोलिसांनी बोलेरो वाहनासह ताब्यात घेतले. माशांची किंमत सुमारे 60 हजार आहे. नंतर अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात मासे खोल जमिनीत पुरून नष्ट करण्यात आले. या कारवाईसाठी जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय विकास अधिकाऱ्यांनी विशेष मदत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *