अखेर चंद्रपुरात श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत भाजपच्या पक्ष शिस्तीचेही विसर्जन झाल्याचे बघायला मिळाले. चंद्रपुरात विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सर्वच गणेश मुर्त्या आणि मंडळ पदाधिकाऱ्यांचे विविध संस्था संघटनांच्या वतीने स्वागत करण्याची परंपरा आहे.
चंद्रपुरात भाजपच्या वतीने दरवर्षी लोकमान्य शाळेपुढे मंडप घालून असे स्वागत केले जाते. मात्र यंदा आ. मुनगंटीवार गटाने आधी परवानगी घेत आपला मंडप उभारला तर विरोधी आ. जोरगेवार गटाने याला जोरदार हरकत घेतली. सुमारे तीन दिवस चंद्रपूर ते मुंबई असा हा संघर्ष चालला. शेवटी दोन्ही मंडप आजूबाजूला उभारले गेले .
आ. मुनगंटीवार- आ. जोरगेवार वादात मिरवणुकीचे 2 स्वागत मंडप झालेत. अगदी खेटून उभ्या राहिलेल्या या 2 मंडपांनी सामान्य गणेशभक्त आणि चंद्रपूरकर मात्र आश्चर्य व्यक्त करत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना आ. जोरगेवार यांनी विरोधी गतालाही शुभेच्छा दिल्या. तर आ. मुनगंटीवार यांनी हा आमचा 35 वर्षांचा स्वागताचा प्रघात आहे. आम्ही करूच अशी भूमिका घेतली.
