चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत पडोली चौकात २९८ ग्रॅम ब्राऊनशुगर/हेरॉईनसह दोन आरोपींना अटक केली. जप्त ड्रग्ज, कार, रोख रक्कम व मोबाईल असा एकुण ३०,१९,५५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
नागपूर-चंद्रपूर रोडवरील पडोली चौकात सापळा रचण्यात आला. त्यावेळी कार मधून नितीन उर्फ छोटु शंकर गोवर्धन (४२, बाबुपेठ) व साहिल सतिश लांबदुरवार (२३, भिवापूर वार्ड) हे दोघे ब्राऊनशुगर विक्रीसाठी नेत असल्याचे आढळले. दोघांविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पडोली पोलीस करीत आहेत.
