चंद्रपुरात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची धडक कारवाई ,जलनगर भागातून एमडी ड्रग तस्कर अटकेत, सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल जप्त

चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी धडक कारवाई करत शहराच्या जलनगर भागातून एमडी ड्रग तस्कराला अटक केली आहे. गुन्हे शाखा पथक गस्तीवर असताना त्यांना कंजर मोहल्ला भागातील एका जुन्या घरात एमडी ड्रगसाठा लपवून ठेवला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या घरावर धाड टाकण्यात आली. धाडीत 18.95 ग्राम एमडी यासह इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्वांची एकत्रित किंमत सुमारे दीड लाख रुपये आहे. याप्रकरणी ललित उर्फ आर्यन बादल कंजर या 38 वर्षीय ड्रग तस्कराला अटक करण्यात आली आहे. पुढील कारवाई रामनगर पोलीस ठाणे पथक करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *