चंद्रपूर शहर मनपाच्या आमसभेत आज मोठा गदारोळ झाला. शहरातील विविध वार्डांमध्ये अतिरिक्त सफाई कर्मचारी व शिपाई नेमणूक करण्याच्या मुद्द्यावर दोन्हीकडून खडाजंगी झाली. चंद्रपूर शहर मनपा भाजपची सत्ता केवळ एका मताने आल्यानंतर आता प्रत्येक विषयावर विरोधक आक्रमक होताना दिसत आहेत.
सफाई कामगार पुरविण्याचे कंत्राट, चौकशी सुरू असलेल्या एका वादग्रस्त संस्थेला देण्यावरून सभागृहात आरोप -प्रत्यारोप झाले. काँग्रेस नगरसेवकांनी खोटी कागदपत्रे तयार करून सफाई कामगारांचे कंत्राट घेऊन घेऊ इच्छिणाऱ्या संस्थेला ठाम विरोध केला. तर सत्ताधारी भाजपने मात्र ही शहराची गरज आहे असे सांगत कंत्राट मंजुरी कडे नेत असल्याचे संकेत दिले.
