शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी चंद्रपूर पोलिसांची ‘सुरक्षा मंत्र’ मार्गदर्शिका

चंद्रपूर जिल्ह्यातील शाळकरी विद्यार्थ्यांना सामाजिक, कायदेशीर, ऑनलाइन आणि मानसिक ताणतणावाच्या विविध संकटांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी ‘सुरक्षा मंत्र’ नावाची विशेष मार्गदर्शिका तयार केली आहे. या मार्गदर्शिकेचे प्रकाशन विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या मार्गदर्शिकेत विद्यार्थ्यांना गुड टच-बॅड टच, लैंगिक अत्याचारापासून संरक्षण, सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडियावरील धोके, अमली पदार्थांचे दुष्परिणाम, मानसिक आरोग्य तसेच वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी यासाठी पोलिस हेल्पलाइन क्रमांकांची माहितीही देण्यात आली आहे. या मार्गदर्शिकेचा वापर शिक्षक आणि पालकांनाही संवेदनशील विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी करता येणार आहे.

आपत्कालीन मदतीसाठी डायल 112, महिला हेल्पलाइन 1098 आणि सायबर हेल्पलाइन 1930 वर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *