चंद्रपुरात आंतरराज्यीय वाहनचोर टोळीचा पर्दाफाश, ११ दुचाकींसह दोन आरोपी जेरबंद

चंद्रपूर शहर पोलिसांनी आंतरराज्यीय वाहनचोर टोळीचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सुमारे ४ लाख ३० हजार रुपये किमतीच्या ११ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चौकशीत आरोपींनी चंद्रपूर, वणी, भद्रावती, नागपूर आणि तेलंगणातील वाहनचोरीची कबुली दिली असून, चोरीच्या वाहनांचे बनावट नंबर लावून विक्री करण्याचा त्यांचा डाव उघड झाला आहे. ही कारवाई चंद्रपूर शहर पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *