चंद्रपुरात महसूल विभागाच्या मंजुरीनंतर पोलिसांची धडक कारवाई, भाजप नेता अजय सरकार याला 3 महिन्यांसाठी जिल्ह्यातून केले हद्दपार

चंद्रपुरात महसूल विभागाच्या मंजुरीनंतर पोलिसांनी धडक कारवाई करत भाजप नेते अजय सरकार याला 3 महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. यासंदर्भात प्रत्यक्ष अंमलबजावणी देखील करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत सरकार याला मिळालेल्या भाजपच्या तिकिटावरून आ. मुनगंटीवार आणि आ. जोरगेवार गटात टोकाचा संघर्ष झाला होता. तर याच नावावरून उमेदवार यादीच बदलली गेल्याचा वाद उफाळला होता. अपक्ष लढलेल्या सरकार याचा पराभव झाला होता. सूत्रांच्या माहितीनुसार अजय सरकार याच्यावर 20 हुन अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. जोरगेवार गटाने सतत पाठपुरावा केल्याने ही कारवाई झाल्याचे बोलले जात आहे. या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *