महानगरपालिका आणि अन्न औषध प्रशासनाकडे पाठपुरावा करत करून दाखविले , ड्रग विक्रेत्यांना वचक बसावा यासाठी जाणीवपूर्वक कारवाई केल्याची दिली माहिती
चंद्रपूर शहरातील पान शौकिनांचे आवडते ठिकाण असलेल्या जटपुरा गेट परिसरातील इटनकर पान शॉप वर 25 जून च्या रात्री चंद्रपूर पोलिसांनी धाड घालून घातक एमडी ड्रग जप्त केले होते. यात पान टपरी चालक ओम इटनकर याला ताब्यात घेत त्याच्याकडून 104 ग्रॅम एमडी सह सुमारे साडेसहा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. ड्रग तस्करी विरोधात मिशन मोडवर काम करत असलेल्या पोलीस अधीक्षकांनी इटनकर पान टपरी कायदेशीर मार्गाने बंद व्हावी यासाठी महानगरपालिका आणि अन्न औषध प्रशासनाकडे पाठपुरावा चालविला होता. आदेश प्राप्त करत आज पोलिसांनी ही मालमत्ता प्रक्रिया पूर्ण करत सील केली आहे. ड्रग तस्करीत सहभागी व्हाल तर अशाच पद्धतीने मालमत्ता सील केली जाईल असा वचक निर्माण व्हावा यासाठी ही कारवाई जाणीवपूर्वक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. कायदा आपले काम करेल असेही त्यांनी स्पष्ट केले
