गांजा विक्री करणाऱ्या गुन्हेगाराने चंद्रपूर शहर पोलीस ठाणे आवारात केले विष प्राशन, उपचारादरम्यान झाला मृत्यू , पोलीस तपास सुरू

गांजा विक्री करणाऱ्या एका गुन्हेगाराने चंद्रपूर शहर पोलीस ठाणे आवारात विष प्राशन केलं. घटना लक्षात आल्यावर तातडीने पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान या गांजा विक्रेत्याचा मृत्यू झाला. दिलीप यादव -४४ असं मयताचे नाव आहे. त्याने आत्महत्येपूर्वी तयार केलेला व्हिडिओ वायरल झालाय. माझी कुठलीही चूक नसताना मला ठाण्याच्या पथकातील काही कर्मचाऱ्यांनी त्रास दिल्याचे यात नमूद केले आहे. चार दिवसांपूर्वी शहरातील बाबूपेठ परिसरात गांजा विक्री प्रकरणी शहर पोलिसांनी धाड टाकली होती. या धाडीतील आरोपीने दिलीप यादव बाबत माहिती दिली होती. त्यावरून दिलीप यादव याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलविले होते. मात्र आज तो पोहोचताच त्याने ही कृती केली. पोलीस तपास सुरू आहे. मयताच्या भावाने मात्र वसुलीच्या छळानंतर आत्महत्या केल्याचे संगत दोषींवर कारवाईची मागणी केली आहे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *