चंद्रपुरात पोलीस अधीक्षकांनी अल्पवयीन दुचाकीस्वार आणि त्यांच्या पालकांचा घेतला क्लास, एकूण 65 अल्पवयीन मुला-मुली विरोधात करण्यात आली कारवाई

चंद्रपूर पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण शाखेत आज चक्क अल्पवयीन दुचाकीस्वार आणि त्यांच्या पालकांचा पोलीस अधीक्षकांनी क्लासच घेतला. मागील आठवडाभरात वाहतूक नियंत्रण शाखेने चंद्रपूर शहर- जिल्ह्यात मिशन मोडवर कारवाई करत दुचाकी चालवणाऱ्या 65 अल्पवयीन मुला-मुली विरोधात कारवाया केल्या. चंद्रपूर जिल्ह्यात दररोज रस्ते अपघातात एक मृत्यू ओढवत आहे.

यामुळे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी वाहतूक नियंत्रण शाखेला यावर नियंत्रण आणण्याची कामगिरी सोपविली. वाहतूक नियंत्रण शाखेच्या आवारात पोलीस अधीक्षकांनी अल्पवयीन दुचाकी चालवणारे मुले- मुली आणि त्यांच्या पालकांना या संदर्भातले कायदे, गुन्हा घडल्यास उद्भवणारी स्थिती आणि 25 हजार रु. चा जबर दंड याबाबत सविस्तर माहिती दिली. आपल्या, रस्त्यावरील नागरिकांच्या आणि पालकांसाठी अल्पवयीन मुला-मुलींना दुचाकी चालवायला देऊ नका असे आवाहन त्यांनी यानिमित्ताने केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *