चंद्रपूर जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कोरपना- गडचांदूर भागात सहाव्यांदा पूर आल्याने शेतकरी हवालदिल

चंद्रपूर जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 97 टक्के एवढा पाऊस नोंदला गेला असून अजून पावसाचा एक महिना शिल्लक आहे.

जिल्ह्यातील वर्धा- वैनगंगा व इतर नद्यांनी अनेकदा पात्र सोडल्याने या भागातील शेतकरी पुरता कोलमडून गेला आहे. एकट्या वर्धा नदीच्या तीरावर असलेल्या गडचांदूर- कोरपना भागात सहाव्यांदा पूर आल्याने शेती खरबडून गेली आहे.

एकीकडे बोंड अळी आणि येलो मोझॅक ने शेतकऱ्यांचे हाल केले असताना आता शेती करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *