बस्स… आता ओबीसींचेही ठरले, मराठा समावेशाविरोधात चंद्रपुरात 2 सप्टेंबरला धरणे तर 13 सप्टेंबरला महामोर्चा, जरांगेचा जोरदार विरोध करण्याचा निर्धार

राज्याची राजधानी मुंबईत मराठ्यांनी ओबीसी आरक्षण समावेशासाठी जोरदार आंदोलन पुकारले आहे. या विरोधात विदर्भातआता वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. चंद्रपुरात ओबीसी संघटनांनी आज एक मोठी बैठक घेत जरांगेंच्या प्रयत्नांना जोरदार विरोध करण्याचे ठरविले आहे.
चंद्रपूर शहरातील गांधी चौकात उद्या 2 सप्टेंबर रोजी ओबीसी निदर्शने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून 13 सप्टेंबर रोजी शहरात ओबीसी महामोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे.
आधीपासून मराठ्यांना एसबीसी आणि ईडब्ल्यूएस या दोन्ही गटातून आरक्षण दिले गेले आहे. मात्र आता ओबीसी गटातून त्यांनी चालवलेल्या प्रयत्नांना राज्यभर जोरदार विरोध करू अशी भूमिका ओबीसी आंदोलकांनी घेतली आहे. राज्यात ओबीसी आंदोलन पेटून उठले असून विविध जिल्ह्यातही अशाच प्रकारचे मोर्चे आयोजित करण्याचा निर्धार ओबीसी कार्यकर्त्यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *