चंद्रपूर शहर भाजपात गणेश विसर्जन मिरवणुकीवरून पक्षातील शिस्तीचेही विसर्जन

विसर्जन मिरवणुकीत मुनगंटीवार -जोरगेवार यांचे शेजारी असतील स्वतंत्र मंडप 

मनपा आणि पोलीस प्रशासनासाठी झाली डोकेदुखी

चंद्रपूर भाजपातील मुनगंटीवार – जोरगेवार वादाचा नवा अंक बघायला मिळणार

6 सप्टेंबर रोजी चंद्रपूरसह राज्यभरात अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन मिरवणुकीची धामधूम राहणार आहे. चंद्रपूरच्या दोन प्रमुख रस्त्यांवर या दिवशी गणेश भक्तांची एकच गर्दी असते. चंद्रपुरात विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांचे स्वागत करण्याची विविध पक्ष व सामाजिक संघटनांची परंपरा राहिली आहे. यासाठी मुख्य रस्त्यावर मंडप उभारून कार्यकर्त्यांचे -मंडळ पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले जाते. याचसाठी शहरातील लोकमान्य शाळेपुढे मंडप उभारण्यावरून आ. मुनगंटीवार आणि आ. जोरगेवार यांच्यातील वादाचा नवा अंक बघायला मिळणार आहे.
चंद्रपूर शहर भाजपात गणेश विसर्जन मिरवणुकीवरून पक्षातील शिस्तीचेही विसर्जन होण्याची चिन्हे आहेत. शहर भाजपचे अध्यक्ष असलेल्या सुभाष कासनगोट्टूवार यांनी पालिकेकडे अर्ज करत नेहमीच्या जागी भाजपचा मंडप उभारू देण्याची मागणी केली तर दुसरीकडे याच जागी मुनगंटीवार गटाचे कार्यकर्ते आणि माजी शहर अध्यक्ष राहुल पावडे यांनीही मंडप उभारण्यासाठी तयारी सुरू केली. 2गटांच्या वादात आयुक्तांनी आता दोन मंडप शेजारी उभारण्याची परवानगी दिली आहे. यावरून वाद उत्पन्न होऊ नये यासाठी आता मंडपाच्या शेजारी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. आता विसर्जन मिरवणुक स्वागतासाठी आ. मुनगंटीवार आणि आ. जोरगेवार यांचे शेजारी -शेजारी स्वतंत्र मंडप असतील. हा नवा राडा मनपा आणि पोलीस प्रशासनासाठी डोकेदुखी झाला आहे. चंद्रपूर भाजपातील आ. मुनगंटीवार विरुद्ध आ. जोरगेवार वादाचा नवा अंक विसर्जनादिवशी बघायला मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *