गडचिरोली- छत्तीसगड सीमेवर नक्षल्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त , पुरुन ठेवलेले साहित्य गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ कडून नष्ट

सामुग्रीत 5 टन वजनी लेथ मशीनचा समावेश, जवानांकडून विविध नक्षली साहित्य घटनास्थळीच करण्यात आले नष्ट

नक्षल्यानी महाराष्ट्र – छत्तीसगड सिमेवरील गडचिरोली जिल्ह्यातील बालबेडा जंगल परिसरात शस्त्रनिर्मिती व इतर साहित्य लपवून ठेवले असल्याबाबतची माहिती गडचिरोली पोलीस दलास मिळाली होती. जंगल परिसरात विशेष अभियान पथक गडचिरोली व प्राणहिता उपमुख्यालय यांच्या संयुक्त 6 तुकड्या, बिडीडीएसचे 01 पथक व सिआरपीएफचे पथक शोध अभियान राबविण्यासाठी रवाना करण्यात आले.

बिडीडीएसच्या जवानांनी परिसराची कसून तपासणी केली असता, 5 ते 6 टन वजन असलेली एक लेथ मशीन, 150 नग क्लेमोर आणि बिजीएल पाईप्स,220 नग 12 बोअर पाईप,20 नग रायफल रॉड मेटल पट्टी आदी नक्षल साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश आले आहे. पथकातील जवानांच्या सहाय्याने काही साहित्य जागीच नष्ट करण्यात आले. सक्रीय नक्षलवाद काळात विविध नक्षल सप्ताह, निवडणूक इ. प्रसंगी सुरक्षा दलांवर हल्ले करण्यासाठी हा साठा नक्षल्यानी लपवून ठेवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *