व्यसनमुक्त गडचिरोलीचा संदेश देण्यासाठी मॅरेथॉन मध्ये वरिष्ठ अधिका-यांसह 500 हून अधिक पोलीस अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग
जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने व्यसनमुक्त गडचिरोली चा नारा देत एका मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. समाजात अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करणे आणि व्यसनमुक्त, निरोगी व सुरक्षित समाज निर्माण करण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये आरोग्य स्वास्थ्य विषयक जागरुकता निर्माण व्हावी यासाठी ही मॅराथॉन आयोजित करण्यात आली.
सुमारे 5 कि. मी. अंतराच्या या मॅरेाथॉनमध्ये पोलीस अधीक्षक एम. रमेश, यांच्यासह अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या मॅरेथॉनमध्ये सहभागींना प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात येऊन सर्व सहभागींचे कौतूक करण्यात आले. अंमली पदार्थाची तस्करी, विक्री आणि सेवन याविरुध्द कठोर कारवाई करण्यासोबतच जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने विशेष भर दिला जात आहे.

