माविमच्या वतीने सिदूर येथे शेवगा लागवड

चंद्रपूर, दि. १२ : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महिला आर्थिक विकास महामंडळ संलग्नित खुशिया लोकसंचालित साधन केंद्र चंद्रपूरद्वारे सिदूर या गावात दोन एकर क्षेत्रात शेवगा लागवडची सुरुवात करण्यात आली. सदर उपक्रमांतर्गत ३ वर्ष शेवगा उत्पादित केला जाणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गावातील लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, शेवगा क्लस्टर म्हणून विकसित होण्याचे ध्येय तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ, पारंपारिक पिकांव्यतिरीक्त इतर पीक शेतात घेण्याचा उद्देश आहे.

यावेळी महिला आर्थिक विकास मंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदिप काठोळे, सहाय्यक कृषी अधिकारी श्री. भोयी, खुशिया लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्षा सुनिता गणफाडे, सिदूरचे उपसरपंच संजय गणफाडे, व्यवस्थापक शारदा हुसे, अंबुजा फाऊंडेशनचे क्षेत्रीय समन्वयक विवेक शेंडे, वैभवी उलामाले, संगिता ढेंगळे, रोशन्ती सागोरे, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

तत्पूर्वी गावात ४० महिलांनी जीवामृत दशपर्णी व गांडूळ खत निर्मिती सुरू केली आहे. रासायनिक शेती न करता सेंद्रिय पध्दतीने शेती करण्याकडे कल निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षणानंतर गावात मिश्र गट तयार करण्यात आले असून २० कुटुंबानी गट शेती करण्याचा मानस आहे. जिल्ह्यात पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणा-या फार्मर क्लबमध्ये सिदूर या गावाचा अत्यंत चांगला सहभाग आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *