रोज 2000 च्या गटातील उमेदवारांना दिला जातोय भरतीत प्रवेश, संपूर्ण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पारदर्शकतेने भरती होत असल्याने अपवांना बळी न पडण्याचे पोलिसांचे आवाहन
चंद्रपुरात पोलीस भरती 2024 25 च्या प्रक्रियेला 11 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. रिक्त 215 पदांसाठी राज्यभरातून 20,683 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत। रोज सुमारे 2 हजार च्या गटातील उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी प्रवेश दिला जात आहे. ही भरती प्रक्रिया संपूर्ण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पारदर्शकतेने होत असल्याने कुठल्याही अफवांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
चंद्रपूरच्या पोलीस कवायत मैदानावर होत असलेल्या या भरतीत आधी शारीरिक मोजमाप नंतर मैदानी चाचणी आणि नंतर लेखी परीक्षा होणार आहे. यासाठी उमेदवारांच्या निवास, पार्किंग यासह इतर सुविधा उभारण्यात आल्या असून भरती प्रक्रियेबाबत शंका असल्यास त्यासाठी अपील , सीसीटीव्ही तपासून लगेच निर्णय दिला जात आहे. भरती प्रक्रियेसाठी एकूण 68 पोलीस अधिकारी, सुमारे साडेतीनशे कर्मचारी व 37 मंत्रालय लिपिक कार्यरत आहेत.
