खासदार प्रतिभा धानोरकर यांचा वनमंत्र्यांना थेट इशारा, चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांवर भुर्दंड होत असल्याचा आरोप
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेश आणि सफारी शुल्क सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असल्याने चंद्रपूर जिल्ह्याच्या नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. विशेषतः शनिवार-रविवारसाठी कोर झोनमधील तब्बल १२,६०० चे शुल्क स्थानिक लोकांसाठी ताडोबा दर्शन केवळ एक ‘स्वप्न’ बनवत आहे.
याच पार्श्वभूमीवर तातडीने शुल्क कपातीची मागणी केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मानव-वन्यजीव संघर्ष आहे. नागरिक वाघांच्या हल्ल्यांमुळे जीव गमावत असताना, त्याच जिल्ह्यातील लोकांना वाघाचे दर्शन घेण्यासाठी हजारो रुपये मोजावे लागत आहेत. हा दुजाभाव त्वरित थांबवावा, अशी स्थानिकांची मागणी आहे.
सध्याचे प्रवेश शुल्क (प्रति जिप्सी, एक वेळ):
झोन दिवस एकूण शुल्क
कोर सोमवार – शुक्रवार रु. ८,६००
कोर शनिवार – रविवार रु. १२,६००
बफर सोमवार – शुक्रवार रु. ७,३००
बफर शनिवार – रविवार रु. १०,३००
“स्थानिक नागरिकांना ताडोबा येथे बघण्यासाठी केवळ ₹२७००/- वाहन शुल्क आणि ₹६००/- गाईड शुल्क आकारले जावे. ताडोबामुळे चंद्रपूरची ओळख आहे, पण आज ताडोबा येथील लोकांनाच परका झाला आहे. हा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. १ ऑक्टोबरपासून ‘जिप्सी प्रवेश बंद’ आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.
