चंद्रपूर मनपाच्या पाणीटंचाई विषयक विशेष आमसभेत आज विरोधी पक्षाचे नगरसेवक आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. अमृत टप्पा 1आणि 2 शहरात कार्यरत असताना पाणीटंचाई का उद्भवली? नागरिकांना दारोदार पाण्यासाठी का भटकावे लागत आहे ,असे प्रश्न विचारून विरोधकांनी सभा दणाणून सोडली.
या दोन्ही योजना एकत्रित करून सुमारे 550 कोटी खर्चले गेले आहेत, ते पैसे गेले कुठे असा सवाल त्यांनी विचारला. महापौर आणि आयुक्तांनी यावर थेट उत्तर न देता मलमपट्टीची घोषणा केली. यात आठवडाभरात प्रत्येकी 2 नगरसेवका मागे प्रभागात टँकर वाढ, बोरिंग निर्मिती आणि प्लास्टिक पाणी टाक्या पुरविण्याचा नामुष्कीचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला.
