चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातल्या राजोली शेतशिवारात कुजलेल्या अवस्थेत आढळले वाघिणीचे शव

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातल्या राजोली शेतशिवारात कुजलेल्या अवस्थेत एका पूर्ण वाढीच्या वाघिणीचे शव आढळले आहे. प्राथमिक तपासानुसार सुमारे वीस दिवस आधी वाघिणीचा मृत्यू झाला आहे.

वाघिणीची कातडी व इतर सर्व अवयव शाबूत आहेत. वनपथक व उच्चस्तरीय वनाधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. तज्ञांच्या उपस्थितीत पंचनामा सुरू आहे. या वाघिणीचा मृत्यू कसा झाला याबाबत मात्र अद्याप अनिश्चितता आहे. विशेष बाब म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील राखीव वनक्षेत्रात या ना त्या कारणाने वाघाचे सातत्याने मृत्यू होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *