चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा क्षेत्रातील मत चोरीचा मुद्दा काँग्रेसने पुन्हा चर्चेत आणला आणला आहे. विधानसभा निवडणुकीआधी 6 हजाराहून अधिक बोगस मतदारांची नावे काँग्रेसच्या तक्रारीनंतर प्रशासनाने वगळली होती. अजूनही या क्षेत्रात हजारो बोगस मतदार असल्याची शंका काँग्रेसने व्यक्त केली.
बोगस मतदार कुणी नोंदविले ते मात्र अद्याप मोकाट असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय. या क्षेत्रातील मतदानाच्या दिवशी सापडलेल्या 61 लाख रुपयाच्या रकमेचा एफ आय आर देखील प्रलंबित असल्याचा संताप व्यक्त केलाय. निवडणूक आयोग याबाबतीत नाकर्त्या प्रशासकाची भूमिका बजावत असल्याचा आरोप काँग्रेसने केला.
