चंद्रपूर जिल्ह्यात वनवा विझवताना वनरक्षकांच्या 3 गाड्या जळून खाक झाल्या आहेत. सिंदेवाही तालुक्यातील वाघ डोंगर परिसरातील ही घटना असून काल दुपारी या परिसरातील जंगलात आग लागल्याची माहिती मिळताच वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझवण्यासाठी आपल्या दुचाकी रस्त्याच्या कडेला ठेवून वनवा विझवण्यास सुरुवात केली मात्र वनवा विझवताना वन कर्मचारी जंगलाच्या बरेच आत निघून गेले. मात्र ही आग पसरत कर्मचाऱ्यांच्या गाड्यांपर्यंत पोहोचली आणि तीन गाड्या जळून पूर्णपणे खाक झाल्या, संध्याकाळी आग विझवून परत आल्यावर वन कर्मचाऱ्यांना त्यांच्या गाड्या आगीत जळून खाक झाल्याचं लक्षात आलं.
