चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातल्या मिंथुर गावाजवळ शेतात काम करणा-या शेतक-याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्य झाला. हरिदास महादेव कुबडे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. याशिवाय या भागात वाघाच्या हल्ल्यात ग्रामस्थांसह पाळीव जनावरे देखील बळी पडले.
या घटनानंतर संतप्त ग्रामस्थांनी नागभीड तहसील कार्यालयावर मोर्चा काढत वाघांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली. तसेच शेतकऱ्यांना संरक्षण देण्याचीही मागणी करण्यात आली. प्रशासनाने वाघांच्या बंदोबस्तासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आणि परिसरात गस्त वाढवण्याचे आश्वासन दिले आहे.
