चंद्रपुरात ई एन टी तज्ञ डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये धाडसी चोरी, अलमारी तोडून लांबविली एक लाख रुपयांची रोख रक्कम

चंद्रपुरात ई एन टी तज्ञ डॉक्टर मनिष मुंधडा यांच्या क्लिनिकमध्ये धाडसी चोरी झाली. पहाटे साडेतीनच्या सुमारास दोन चोरट्यांनी मागील दाराने इमारतीत प्रवेश केला. यानंतर ते थेट क्लिनिकच्या चेंबरमध्ये पोचले. त्यापैकी एकाने अवजड साहित्याने अलमारी तोडून एक लाख रुपयांची रोख रक्कम लांबविली. एका बंद बॉक्स मध्ये ठेवलेली काही कागदपत्रेही त्यांनी लांबविली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी ईएनटी तज्ञ डॉ. मनिष मुंधडा यांनी केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *