क्रिकेट व नृत्य स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यास उपस्थिती

भद्रावती तालुक्यातील मौजा माजरी येथे स्व.नंदूभाऊ सूर यांचे स्मृती प्रित्यर्थ शिवगर्जना क्रिकेट क्लबच्या वतीने काल (दि.२१) श्री.प्रवीण सूर यांनी आयोजित केलेल्या भव्य क्रिकेट स्पर्धा आणि सांस्कृतिक नृत्य स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळ्यास उपस्थित राहून विजयी खेळाडूंना व नृत्य स्पर्धेतील कलावंतांना बक्षीस वितरण केले.

कला आणि क्रीडा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. माजरीतील स्पर्धेसाठी आलेल्या तरुणांनी या दोन्ही क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. ग्रामीण भागातील तरुणांमध्ये प्रचंड टॅलेंट आहे, फक्त त्यांना योग्य व्यासपीठ मिळण्याची गरज असते. तरुणांनी अभ्यासासोबतच मैदानावर आणि रंगमंचावरही आपली चमक दाखवावी, खेळ केवळ जिंकण्यासाठी नसून शरीराच्या आणि मनाच्या आरोग्यासाठीही तितकेच महत्त्वाचे आहेत. अशा स्पर्धांमधून उद्याचे राष्ट्रीय खेळाडू व उत्कृष्ट कलावंत घडतील, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी माझ्यासमवेत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष श्री.रवींद्र शिंदे, वरोरा नगर परिषदेचे नगरसेवक मनीष जेठाणी, भद्रावती नगर परिषदेचे नगरसेवक फैश्याज शेख, ग्राम पंचायत सदस्य अमर जुमडे, पत्रकार चैतन्य कोहळे, राजेश रेवते, रवी भोगे,बबलू रॉय, आकाश वानखेडे, समय बहादे,राकेश नक्षीने यांचेसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शिवगर्जना क्रिकेट क्लबचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *