गडचिरोली जिल्ह्यात उरले मोजकेच नक्षली, 11 जहाल नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण

 महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे जाहिर केले होते एकुण ६८ लाख रुपयांचे बक्षिस, जिल्ह्यातील १० उपविभागात सक्रिय असणारी नक्षल चळवळीचे आता फक्त भामरागड उपविभागाच्या सिमावर्ती भागातच अस्तित्व, 2005 पासून आजवर एकुण ७९४ नक्षल्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर केले आत्मसमर्पण

गडचिरोली जिल्ह्यात आता मोजकेच नक्षली शिल्लक आहेत. आज 11 जहाल नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. पोलिसांच्या रेकॉर्डनुसार जिल्ह्यात सध्या सक्रिय असलेल्या 6 नक्षलवाद्यांपैकी केवळ एक नक्षलवादी मूळ गडचिरोली जिल्ह्यातील आहे तर इतर पाच मात्र छत्तीसगडचे रहिवासी असून ते सीमावर्ती भागातच सक्रिय आहेत. आज आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यावर महाराष्ट्र शासनाने एकत्रितपणे एकुण ६८ लाख रुपयांचे बक्षिस जाहिर केले होते. जिल्ह्यातील १० उपविभागात सक्रिय असणा-या नक्षल चळवळीचे आता फक्त भामरागड उपविभागाच्या सिमावर्ती भागातच अस्तित्व राहिले आहे. 2005 पासून आजवर एकुण ७९४ नक्षल्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज शस्त्रे ठेवलेल्या नक्षल्यात ०१ डिव्हीसीएम, ०१ एरीया कमिटी सचिव, ०१ पीपीसीएम, ०१ कमांडर, ०१ एसीएम यांच्यासह 6 इतर सदस्यांचा समावेश आहे.

१) सोनी ऊर्फ बाली वत्ते मट्टामी (डिव्हीसीएम- कुतुल दलम) वय ४५ वर्षे, रा. बालेवाडा, ता. कोहकामेटा, जि. नारायणपूर (छ.ग.)

२) बुदरी ऊर्फ रामबत्ती आयतु मट्टामी (एरीया कमिटी सचिव इंद्रावती एरीया कमिटी), वय ४० वर्षे, रा. बोडगा, ता. व जि. बीजापूर (छ.ग.),

३) सुखलाल बोळगा कोक्सा (कमांडर पश्चिम ब्युरो सप्लाय टीम), वय ३१ वर्षे, रा. काकुर, ता. कोहकामेट्टा, जि. नारायणपूर (छ.ग.),

४) शांती ऊर्फ सोमरी गंगा तेलामी (पिपीसीएम पश्चिम ब्युरो सप्लाय टीम), वय २८ वर्षे, रा. नागाराम, ता. कोंटा, जि. सुकमा (छ.ग.),

५) यमुनक्का ऊर्फ रुखमाक्का पोट्टी पेंदाम (एसीएम – भामरागड दलम), वय ६० वर्षे, रा. गुड्डीगुडम (पोस्टे राजाराम खां), ता. अहेरी, जि. गडचिरोली

६) गणेश उलगे कोवासी (सदस्य कंपनी क्र. १०), वय २१ वर्षे, रा. हिक्केर (पोस्टे गर्दैवाडा), ता. एटापल्ली, जि. गडचिरोली,

७) मिनको ऊर्फ जमनी काऱ्या मट्टामी (सदस्य कंपनी क्र. १०), वय २२ वर्षे रा. मुस्पर्शी (पोस्टे बांधे), ता. पखांजूर, जि. कांकेर (छ.ग.),

८) धनु दसरु वेळंजे (सदस्य कंपनी क्र. १०), वय ३८ वर्षे, रा. ताडगाव, ता. भामरागड, जि. गडचिरोली,

९) सुनिता ऊर्फ वंगे वत्ते होयाम (सदस्य सैंड्रा दलम), वय २५ वर्षे, रा. वेलगंड्रा (पोस्टे परसेगड), तह. व जि. बीजापूर (छ.ग.),

१०) रमेश पांडू मडावी (सदस्य मोचाईल पोलीटीकल स्कुल), वय २८ वर्ष, रा. गोगागुडा, तह. व जि. सुकमा (छ.ग.),

११) किशोर सुक्रैय्या वासम (मिलिशीय कमांडर -सैंड्रा दलम), वय ३३ वर्षे, रा. सेंड्रा (पोस्टे परसेगड), ता. भोपालपट्टनम्, जि. विजापूर (छ.ग.) यांनी गडचिरोली पोलीस दल आणि सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण केले आहे.

१५ ऑक्टोंबर २०२५ रोजी नक्षल नेता मल्लोजुला वेणूगोपाल राय ऊर्फ भुपती याच्यासह एकूण ६१ माओवाद्यांनी ५४ अग्निशस्त्रांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण केल्यामुळे गडचिरोली आणि संपूर्ण दंडकारण्य विभागातील नक्षल चळवळीला मोठा हावरा बसलेला होता. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल चळवळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर आली असून भूपतीच्या आत्मसमर्पणानंतर देशभरात एकूण ८९७ नक्षल्यांनी ५४५ शस्त्रांसह आत्मसमर्पण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *