चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातल्या आल्फर गावातील एका शेताजवळच्या नाल्यातून मगराचे थरारक रेस्क्यू ऑपरेशन, चारगाव धरणात सुरक्षित सोडले

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील आल्फर गावात नितेश तुरानकर यांच्या शेतातील नाल्यात मोठा मगर आढळला. ही बातमी गावात पसरली. तत्काळ वनविभाग वरोरा यांना कळवण्यात आले. त्यानंतर वनविभागाने ‘अपास’ एनजीओची रेस्क्यू टीम बोलावली. दुपारच्या सुमारास सुरू झालेल्या या ऑपरेशनमध्ये पाण्यातील मगराला सापळा लावून पकडण्यासाठी रेस्क्यू टीमला अथक परिश्रम करावे लागले. हा थरार पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. हा मगर साधारण ९ फूट लांब होता. या परिसरात अपास एनजीओने आतापर्यंत पकडलेला नववा मगर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *