भाजप महानगर जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार यांची पदावरून हकालपट्टी… सुभाष कासनगोट्टुवार आमदार किशोर जोरगेवार यांचे कट्टर समर्थक

चंद्रपूर : भाजप महानगर जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार यांची पदावरून हकालपट्टी… सुभाष कासनगोट्टुवार आमदार किशोर जोरगेवार यांचे कट्टर समर्थक, चंद्रपूर मनपासाठी निवडण्यात आलेल्या भाजप उमेदवारांवरून काल जोरगेवार आणि मुनगंटीवार गटांमध्ये झाला होता मोठा वाद, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीने तयार केलेली यादी स्थानिक पातळीवर बदलविण्यात आली आणि जवळजवळ 12 ते 14 नाव वेळेवर बदलण्यात आल्यामुळे कासनगोट्टुवार यांची हकालपट्टी झाल्याची यामागे प्राथमिक माहिती

चंद्रपूर भाजपमध्ये मोठी कारवाई समोर आली आहे.भाजप महानगर जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

सुभाष कासनगोट्टुवार हे आमदार किशोर जोरगेवार यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. चंद्रपूर महानगरपालिकेसाठी भाजप उमेदवारांच्या निवडीवरून काल आमदार किशोर जोरगेवार आणि सुधीर मुनगंटीवार गटांमध्ये जोरदार वाद झाला होता. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीने जाहीर झालेली उमेदवारांची यादी स्थानिक पातळीवर बदलण्यात आल्याचा आरोप आहे. वेळेवर जवळजवळ 12 ते 14 उमेदवारांची नावे बदलण्यात आल्यामुळेच ही कारवाई झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घडामोडीमुळे चंद्रपूर भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली असून, आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *